Friday 31 August 2012

1 Liners

सगळं सुरळीत चालू असताना काहीच Happening वाटत नसतं !!! 

प्रत्येक गोष्टीला  स्वतः ची अशी एक स्टोरी असते !!!!

जासूस का नाम जाना नहीं जाता उसका  काम देखा जाता है !!

पुण्याला आणि कुण्या कुण्याला आपलसं करून घेणारा, जन्मतः नसलेला मी  एक 'पुणेकर' !!

'आपण Schumacher ची आत्या आहोत', ह्या आविर्भावात महिला वर्ग रस्त्याने गाड्या हाकत असतो !!

यमसदनी जायचे असल्यास शांतीत क्रांती करावी.. उगाच रस्त्यावर गाडीखाली येउन ट्राफिकला अडथळा आणू नये!!

गाडी चालवताना लक्षात ठेवा - आपल्या तीर्थरूपांचा मुले जन्माला घालण्याचा कारखाना नाहीये, हर एक बच्चा जरूरी होता है !!

Thanks आणि Welcome ची गरज नसते. पण Thanks आलं की Welcome येतच ओघ ओघाने !!

येथे  व्यक्ती तितक्या   प्रकृती  नुसार  बारसे करून  मिळेल!!

लग्न सोडून इतर ही बऱ्याच करण्यासारख्या गोष्टी आहेत!!!! उदा Engagement!!

चोराच्या मनात चांदणे जरी असले तरी आपलं आकाशगंगेशिवाय काम होत नाही.

Dont think too much about others, if you feel it be an AIRTEL and Express Yourself.

मांजरांना अनेक माणसं उभी जातात.

इतरांचं  वाचलेलं आणि आपल्याला सुचलेलं / आपण रचलेलं ह्यात सचिन व सेहवाग इतकाच फरक असतो.

पाहिजे असलेले Resouces जर manage होत नसतील, तर Company मधील 'Humans' चा काय उपयोग आहे ?

हमें  तो  बस  था  उस  से  वास्ता, लेकिन कमबख्त भूल  गया  प्यारका ही रास्ता|

जो काटे नहीं वो प्यार कैसा,
जिसके काटे ना चुभे वो गुलाब का फूल कैसा ?
जब प्यार होता है तो सिर्फ गुलाब का फूल दिखाई देता है,
वो ही प्यार अगर टूट जाए तो सिर्फ काटे ही काटे नजर आते है|

समोरच्याला इतकी वर्ष खेळताना बघून Tire होण्यापेक्षा त्याला सरळ Re-Tire चा option सुचवा.

उस के बिना सब सुना सुना लगता है, लेकिन ये याद नहीं आ रहा कहा सुना है?

शाब्दिक खेळ करणाऱ्यांना कोणी ही शब्दात पकडू शकत नाही.

शिट्टी वाजवणे ही कला आणि एखदयाला शिट्टी वाजवायला भाग पडणे ही महाकला.

आपल्या दिशेने आलेल्या फुलांना कधी कधी  bat ने उत्तरं द्यावी लागतात.

Social status change is just 2 step process but actually its a lengthy process.

लोकांच्या Status वर स्वतःची अक्कल चालवायला आपल्याला so called Busy status मध्ये वेळ का घालवावा?

ऑफिसमध्ये उशिरा येऊन ९ तास भरताना नाकी नऊ येण्याचा अनुभव घेण्यापेक्षा सरळ घरचा १२ तासांचा अनुभव घ्यावा.

Do involve in tri-angle but make sure you do enough efforts to be at the right angle !!

एखाद्याची Girldfriend असणं, एखादीचा Boyfriend असणं, आणि ह्याच दोघांचा Close friend  असणं ह्या एकाचा नाण्याच्या तीन बाजू आहेत.

Its not a vice-versa in the case if you like somebody... You might just be like everybody for your 'somebody' !!!

Each friday decides the fate of an actor. Same is true for Saturdays and S/W Engineers!!

भावनेच्या भरात केलेल्या गोष्टीमागे भावना नसेल तरी कल्पना नक्कीच असते !!

डोक्यात असलेल्या गोष्टी जर डोक्यात जाऊ लागल्या तर फार पटकन डोकं out होतं !!

Traditional dresses  घालून मिरवण्यापेक्षा Normal dresses घालून जर काही additional work  केला तर तो खरा functional day !!

आयुष्यभर उभे राहून काम करणाऱ्याना Bus Day चं कौतुक. आम्हा सारख्या IT वाल्यांना नाही !!!

अधून मधून status बद्दल status टाकणं हे आज काल  एक प्रकारचं  status झालंय !!!

If a try n catch block is surrendered before an old thread, then its the finally block who has to come up with new resources for a smooth transition!!!

एखाद्याला जास्ती कींमत देऊन त्याची उंची वाढवू नये !!!

नको त्या गोष्टी भाव खाऊ लागल्या की महागाईची जाणीव होते !!!

Even the dynamic plans have those historic static obstacles!!!

Helmet - The best thing to hide while following someone in traffic!!!

लग्न करणं म्हणजे सोलमेट भेटणं नसतंच मुळात!

'कोणी असेल तर सांग !', असं म्हटल्यावर नक्की कोणाला काय सांगायचय हेच मला कळत नाही..

आजकाल बहुधा कोणाकडे काहीच करायला नसलं की लोकं लग्नाच्या मागे लागतात, स्वतःच्या नाहीतर दुसऱ्याच्या !!!

योग्य वेळी सोल-मेट मिळाला नाही, तर हेल-मेटशी जुळवून घ्यायची तयारी ठेवावी!!!

 

Monday 28 May 2012

नोकरी चा ‘Switch’ Hit


    नेहमीप्रमाणे ऑफिस मध्ये Howzat खेळत असताना मित्राचं ई-पत्र आलं. आधी दुर्लक्ष केलं कारण, match interesting चालू होती एकच sub-goal achieve करायचा राहिला होता. So match चालूच ठेवली. पण मित्र मला चांगलाच ओळखत असल्यानं त्याने लगेच gtalk वर सांगितलं, ई-पत्र बघ. आमच्या Company मध्ये Saturday ला walk-ins आहेत. CV लगेच पाठव. ह्याचा परिणाम व्हायचा तोच झाला मध्येच आलेल्या disturbance मुळे match हरलो मी.
    
    बर Howzat खेळतानाची power संपली असल्याने मला लगेच next match ही खेळता येणार नव्हती. म्हणून केवळ नाईलाजानं मी ई-पत्र बघितलं. आणि कधी नव्हे ते company ची requirement आणि माझं profile(job profile) match होत होतं. साडे ३ गुण जुळल्याचा आनंद मला झाला( ४० चं महत्व- हाडाचा Engineer). पण पुढचं फार मोठं काम करायचं होतं, CV तयार करणे. केवळ ह्याच कामासाठी मी कंटाळा केल्याने अनेक Company’s च नुकसान झालं होतं. तसं मला CV मध्ये फक्त ह्याच Company मध्ये मी केलेले projects (?) टाकायचे होते. आठवायचा प्रयत्न केल्यावर लक्षात आलं की इथे मी बरेच दिवस होतो तरी projects काही फार केलेले नाहीत. इतरांनी केलेले projects टाकण्याचा विचार करत होतो पण माझ्या profile चा मी एकटाच इथे असल्यानं तो ही option available नव्हता. पुन्हा मित्राचा gtalk वर संदेश, CV आजच EOD पर्यंत पाठव. म्हणजे आता १/२ दिवसात ह्या कंपनी मध्ये आल्यापासून आपण काय दिवे लावले ते आठवायचे आणि ते लावलेले दिवे समोरच्याला समजेल अशा भाषेत CV मध्ये मांडायचे होते. हे सर्वात अवघड काम होतं.
     
     तरी पण हे काम करायला घेतलं आणि तेवढ्यात ह्याच कंपनी मधील मित्राने विचारलं, ‘ काय भावा आज भाजी कोणती?’ हे होत नाही तर लगेच दुसरा, ‘माझी खिचडी आणलीस ना?’ हे प्रेमळ संवाद होण्याचं कारण, चुकून एकदा ‘मी तुमचे डबे आणेल रोज’ असं म्हणून गेलो होतो आणि त्याची शिक्षा मी कंपनी सोडे पर्यंत भोगली. किंबहुना ह्या डबेवाल्याच्या रोल मधून माझी मुक्तता होईल ह्या विचाराने मी interview देण्यासाठी जास्त पेटून उठलो. डब्याचा विषय निघाल्याने भूक ही लागायला लागली होती. पण भूक लागली तरी जाता येणार नव्हतं कारण, महिला मंडळ जेवायला जाण्यासाठी निघालेलं नव्हतं. Gentleman गिरी म्हणून, ‘तुम्ही जाताय की आम्ही जाऊ गिळायला आधी?’ ह्या प्रश्नाने महिला कार्यकर्त्या जागेवरच्या हलल्या आणि गिळायला गेल्या. निदान आता तास भर तरी शांतता मिळणार होती. ह्याचा शांततेच कधी नव्हे ते फायदा करून घ्यायचा ठरवला आणि बघता बघता latest CV चं 1st draft तयार झाला.
    
   गिळून झाल्यावर फायनल CV तयार केला आणि मित्राला पाठवून दिला. अर्धी लढाई जिंकल्याचा भास झाला. दिवसभराच्या राहिलेल्या वेळात पुन्हा Howzat सुरु केलं. अनेक मित्रांना CV पाठवलेले असल्याने आणि कोणाचा ही reply आलेला नसल्याने इथेही guarantee होतीच interview call न येण्याची. पण ह्या वेळी for a change म्हणून company ने call केला आणि चक्क, ‘तुमचा interview मी ह्या weekend ला schedule केलाय. सकाळी ९.३० ला company मध्ये हजर राहा’. अचानक आलेल्या ह्या disturbance ने friday evening च्या plan वर पाणी सोडावं लागलं. plan वर पाणी सोडणं ही काही नवीन गोष्ट नव्हती.
    
   एकदाचा interview चा दिवस उजाडला. सकाळीच दादा formals मध्ये कुठे निघाला हा प्रश्न भावाच्या चेहऱ्यावर दिसला पण त्याने तो विचारण्यात interest नाही दाखवला आणि मी आपलं interiew ला गेलं की काय होतं हे माहीत असल्यानं त्याला ही मी काही सांगितलं नाही. एकदाचा मित्राच्या company  मध्ये पोहोचलो. interview साठी बरीच जनता आली होती. म्हणजे माझ्या प्रमाणे इतर लोकांचा ही friday evening चा plan cancel झाला होता असं दिसत होतं. सुदैवाने लवकर गेल्याने आमचा नंबर interview साठी फार लवकर लागला. तसही ते फार गरजेचं होतं कारण whole week काही काम केलं नाही की saturday ला येऊन काम करणे हा तर IT Field चा गुणधर्म. ह्या नियमानुसार मला interview देऊन पुन्हा company मध्ये जाऊन काम करायचं होतं.(म्हणजे Howzat खेळताना काम करायचं होतं) interview चा 1st  round झाला. त्यात ठरलेल्या प्रश्नावर(Tell me about yourself) माझं ५.३० मिनिटाचं भाषण झालं. हे भाषण चांगलंच रंगलं. Interviewer ने शेवटी मला मध्येच थांबवीत म्हणाला, ‘बस कर रुलेअगा क्या?’ भाषणाने आणि माझ्या technical knowledge ने प्रभावित होऊन( खर तर interviewer च्या चेहऱ्यावर मला प्रश्न दिसत होता की ह्याला इतकं कसं काय माहिती? पण त्याने तो विचारला नाही. आणि माझं technical knowledge हा वादाचा मुद्दा आहे इतरांसाठी, असो).आमचं हे चर्चासत्र जवळपास ४७ मिनिट चालू होतं. शेवटी HR perosn ने वैतागून सांगितलं उरका बाहेर खूप भीड आहे. एकंदरीत बाहेरील भीड बघून मी विचार केला आपण इथे थांबण्यात अर्थ नाही. हा विचार मी मित्राला बोलून दाखवला तर त्याचा सल्ला, ‘नको तिथे स्वाभिमान बाळगू नकोस. हाकलल्याशिवाय बाहेर पडायचं नाही’. मित्राचा सल्ला ऐकून बराच वेळ तिथेच थांबलो आणि शेवटी कंटाळून HR ला विचारले, “थांबू की निघू?” यावर उत्तर, ‘तुझं interview status नाही आलं माझ्याकडे अजून. कोणी घेतला interview?’ interview घेणारा मुलगा असल्याने नाव लक्षात राहायचा प्रश्नच नव्हता. interviewer ने ४७ मिनितातील संभाषण इतकं मनाला लावून घेतलं की त्याने interview sheet pass-on च केली नव्हती.
    
    शेवटी एकदाची त्यांना interview sheet सापडली आणि, इतक्या लांब आला आहेस तर next round ही देऊन जा ह्या विचाराने माझा next round ही schedule केला. Saturday चं office मधील Howzat चुकणार ह्या धक्क्यामधून मी सावरत next round साठी तयार झालो. Next HR round. HR ची लोकं जशी हवी असतात तशीच होती. पुन्हा एकदा हुकमी प्रश्न आणि भाषण ऐकून HR ही खुश. मग HR ने माझ्या समोर salary structure ठेवलं.
मी - हे काय आहे?
HR- Salary Structure.
मी – (तेवढी मला पण अक्कल आहे असं मनात म्हणत.) पण कुणाचं?
HR - (वैतागून) माझं Salary Structure आहे.
मी- अरेरे फार कमी आहे तुमच्या मानाने? कसं काय जमत इतक्या कमी पगारात?
HR - काय चाललंय? ही तुला ऑफर आहे as per our policy and your interview performance (हे सगळं अगदी शांत चित्ताने आणि हसून)
जेव्हा कळल की हे माझं Salary Structure आहे तेव्हा मी उडालोच. हे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो अंगभर कपडे अस झालं.(मान्य ही म्हण चुकीची आहे. पण जबरदस्त shock बसला की असं सुचतं मला काय करणार?) यथावकाश (to be precise exactly after 57 mins) मला offer letter हातात मिळालं. पुन्हा एकदा चेक केलं मगाच्या संभाषणाचा राग मनात धरून एखादा 0तर कमी नाही ना झाला. पण HR ‘फारच चांगली’ असल्याने तसं काही झालं नाही. ते offer letter  हातात आल्यावर सुधा मला बसलेला shock कमी झालेला नव्हता आणि त्या नादातच मी direct ७ व्या मजल्याहून खाली आणि चक्क जिन्याने आणि ते ही ३-३ लिफ्ट available असताना. मी सात माजले उतरल्यान बराच सावरलो होतो. आता फार important काम करायचं होतं, एक तर घरी new job चं सांगणे आणि दुसरं म्हणजे package सांगणे. घरी सांगितलं तर, घरी ही shock बसलाच. बाबांनी मात्र अगदी शांतपणे विचारलं, ‘आधी offer letter नीट वाच. English आहे ते आणि आता खरं package सांग. कोणी काही म्हणणार नाही’. हा प्रश्न अगदीच अनपेक्षित नव्हता मला. म्हणून मी व्यवस्थित उत्तर देऊ शकलो. भावाची ही साधारण अशीच परिस्थिती होती.
    
     खरतर ज्यांना मी व्यवस्थित माहिती होतो, त्या सगळ्यांच एकच मत होतं की इतकी चांगली company आणि ती सुधा MNC ह्याला मिळूच कशी काय शकते आणि त्यावर इतकं package देऊच कसं शकते आधीचा पगार इतका कमी असताना. शेवटी एकतर ह्याचं आधीच काहीतरी setting असणार अथवा IT Field मध्ये कोणालाही काहीही देतात हा सगळ्यांचा common निष्कर्ष. मी तर interview ला अगदी फिरत फिरत गेलो आणि offer letter घेऊन आलो इतकं साधं आणि सोपं होतं माझ्यासाठी. पण इतरांना ते अगदी जड वाटत होतं. एका collegue चं तर म्हणनं होतं की, इथे काम जास्ती करायला लागलं असतं next week पासून new project वर म्हणून company बदलली. आता हा माणूस गेली ५ वर्षे notice period वर आहे (बहुधा कोणी कोणाला notice द्यायची हे ठरत नाहीये अजून) ह्याला काय कळणार company बदलणं म्हणजे काय? पण मी मात्र job change पेक्षा मी company ला notice देऊ शकलो ह्यातच जास्ती खुश होतो.
    
     एकदाचा notice period संपून मी नवीन company join केली. अगदी पहिल्याच दिवशी office ला जाताना पुण्याची एकंदरीत व्याप्ती किती वाढली याचा अंदाज आला. कारण माझं घर आणि नवीन company ही दोन टोकं होती पुण्याची( निदान माझ्यासाठी तरी). जुनी company खूपच जवळ असल्याने एकदा तर मी नादात जुन्या company च्या parking मध्ये गाडी park केली आणि नंतर लक्षात आलं की आपण ह्यांना आता सोड-चिठ्ठी दिली आहे. तेव्हा इथून लवकर निघा अन नवीन company मध्ये पोहोचा नाहीतर ९ तास भरण्यासाठी जास्ती थांबवा लागेल. सुरुवातीला जास्ती काही काम नव्हतं. आणि MNC असल्यामुळे Facebook हे बंद आणि Howzat ही बंद. म्हणून मग मी शारीरिक हालचाल होईल अशा games कडे वळलो. थोडक्यात virtual world मधून real world मध्ये आलो. बर इथे games मध्ये options म्हणजे TT आणि Pool. TT माहित असल्याने Pool कडे वळलो. आधी नक्की कसं खेळायचं हे observe केलं. तेव्हा लक्षात आलं हा game म्हणजे तर Carrom board वर गोट्या खेळायच्या. आणि त्या गोट्या हाताने न मारता काठीने मारायच्या. भारी वाटलं काही तरी नवीन शिकताना.
    
    दरम्यान मला Job लागलाय हे बऱ्याच लोकांना माहिती झालं होतं. आणि हळू हळू मला IT Field विषयीची लोकांमध्ये असलेली craze लक्षात आली. कारण अगदी लहान मुलांनासुद्धा package हा word माहिती झालाय. कोणीही येतं आणि package विचारतं. ते नाही विचारलं तर दुसरं सल्ला, म्हणे आता काय चांगला job आहे लग्न करा, बहुधा लोकांचा असा गैरसमज आहे की MNC मध्ये पहिल्याच दिवशी तुम्हाला पूर्ण package देऊन टाकतात, की घ्या बाबानो एकदाच घेऊन टाका उगाच आमच्याकडे नको तुमची अमानत. त्यात ज्यांना अर्धवट ज्ञान आहे ते ही म्हणतात, ‘काय रे project झालं का सुरु? नाही मग काय सद्ध्या on-bench का? हो म्हणायचा अवकाश की लगेच अरेरे इतकी चांगली MNC असून नवीन लोकांना बसायला bench काय रे हे? आमचा अमुक अमुक काधेही on-bench नव्हता. अगदी पाहिल्या दिवसापासून त्याला proejct मिळालं होता आणि बसायला खुर्ची. ह्या वर न राहवून मी, ‘अहो काका मला काही खुर्चीची हाव नाही आणि project चं म्हणत असला तर माझ्या calibre चं project अजून यायचा आहे company कडे. अशा ह्या सर्व प्रश्नांमधून डोकं शांत ठेवून काही तरी बोलावं लागतं.
    
    शेवटी एकदाचा bench वरून उचलून मला project वर टाकलं आणि पुन्हा एकदा so called busy schedule सुरु झालं. (मला नंतर असं कळलं ज्याना माझ्यामुळे Pool table वर जास्ती खेळायला संधी मिळाली नाही त्यांनी माझ्या विषयी तक्रार केली आणि मला project assign झाला.)       

Thursday 24 May 2012

Engineering नंतरचे ते दिवस

हा हा म्हणता एकदाची डिग्री पूर्ण झाली आणि मी एक सुशिक्षीत पदवीधर झालो.  Engineeringला असताना अभ्यास करावा, नाही करावा कसा करावा ह्या बद्दल संभ्रम. पण ह्याच Engineering नी ४० ह्या आकड्याचं महत्त्व समजावलं. Engineering चा पेपर दिल्या दिल्या ४० ही magic figure  गाठली की झालेल्या आनंद तर अवर्णनीय. नेमून दिलेल्या वर्षातच Engineering झालं एवढीच काय ती आमची achievement. बाकी Campus Selection  चा तर प्रश्नच नव्हता कारण ४० ह्या आकड्याचा इतका प्रभाव होता  marksheets वर की कंपनीच्या लोकांनी आधीच झिडकारलं. सो  Companies  ने or अन्य कुणी आम्हाला select केलं आणि आम्ही कुणा एकाला select  करण्याचा सवालच नव्हता. थोडक्यात अमुक अमुक कॉलेज ला असून Campus interview ला appear होताच आम्ही बाहेर पडलास असा शिक्का घेऊन बाहेर पडलो.
बर घरी Degree Certificate दाखवलं तर घरून प्रश्न, "काय खरी आहे का ? काय भाव आहे Degree Certificate चा ? किती मध्ये मिळाली ?" ह्या सर्व प्रश्नांची उगम एकच४०  हा आकडा. घरच्यांनी खूप शिक सांगितलेलं पण खूप वेळ शिकावं की काय असा प्रश्न आला मनात,पण Engineering  करतानाच एवढा थकलो की पुढे शिकण्याचा प्रश्नच येत नव्हता. खूप वेळ शिकावं का असा विचार घरी बोलून दाखवला होता पण बोलणी फिसकटली आणि सुदैवाने वर्षातच सुशिक्षित पदवीधर Engineer बेकार झालो.
  Result लागे पर्यंत आणि Result लागल्यानंतर च्या काळात जे मानसिक झीज झाली ती भरून काढण्याचा उपाय म्हणजे 'झोप' अत्यंत काटेकोरपणे पाळला. मी अगदी  Time Table  केलं होतं.
अमुक अमुक वेळ सकाळची झोप. मग ह्या वेळेत दुपारची झोप. रात्रीची झोप तर हवीच. हे झालं मानसिक थकवा आलेला त्याच.शाररीक थकव्याचा प्रश्नच नव्हता कारण घरून आधीच सांगितलं होतं, तब्येतीला सांभाळून Engineering करा.  हे इतकं मनात बसलं होतं की बाळसं कमी होण्याचा प्रश्नच नव्हता. वाढता वाढता वाढे चालूच होतं.
 माझी झोप बघून घरच्यांची झोप उडाली. शेवटी वैतागून त्यांनी एक फतवा काढला, इथून पुढे महिन्यांनंतर आपले आर्थिक मदत बंद करण्यात येणार आहे.   योग्य तो विचार करून,
पावले  उचलावीत. फतवा आईने काढल्या असल्याने गोष्ट Serious आहे हे लक्षात आलं आणि जागं व्हायची वेळ आली. पण काय करावं हे माहीत नसल्याने सगळं करून झालं अगदी Java च्या क्लासेस पासून ते बँकेच्या परीक्षांपर्यंत महिन्याची मुदत ही संपत आली होती म्हणून शेवटी Testing चा Course  join केला.
"Testing  म्हणजे आय रे दादा?" असा लहान भावाचा प्रश्न हजर. त्याला समजेल अशा भाषेत सांगितलं की Testing  म्हणजे चुका काढणे तर  त्याने इतक्या तुच्छतेने बघितलं की अजून ही कधी  कधी  मी दुपारी दचकून जागा होतो.शेवटी एकदाचा Course सुरु झाला.  हळूहळू Course मधलं सगळं कळत होतं त्यामुळे हायसं वाटत होतं. इथे सगळ्यांचा Campus Interview ला appear होतं येणार असल्याने एक स्वप्न तरी पूर्ण होणार होतं.बर Campus Interviewला appear होऊन मला जॉब मिळाला होता. Testing  चे Seeds चांगले पेरालेगेल्यामुळे Job मिळाला होता.
कोणाचाही विश्वास बसत नव्हता पण एकदाचा  Job लागला होता. Offer Letter घ्यायला कंपनी मधेच बोलावलं होतं. तिथं गेल्यावर उगाच असं वाटत होतं की, सगळेच आपल्या कडे बघत आहेत. पण अजूनही पूर्णतः antic  piece झालेलो नव्हतो ह्या confidence ने Offer Letter घेऊन एकदाचा घरी आलो. घराचे एकदम खुश होते. निवांतपणे Offer Letter वाचायला घ्यायचा विचार केला पण Offer Letter १२ पानी होतं आणि पेक्षा जास्ती इंग्लिश pages वाचायची असली की हातात पेन्सील हवीच ह्या Engineering च्या नियमानुसार पेन्सिल शोधून झाली. साधारण ५० शब्दानंतर Bore व्ह्यायाला लागल्याने मुख्य पान काढलं, Salary Structure चं. पण इथेही काही कळल्याने सरळ प्रतिमहिना किती हातात येणार हे अतिशय सोपं Calculation  करून Offer Letter ठेऊन दिलं.  Joining  date  next  month  मध्ये होती.
 Corporate World मध्ये जायचं म्हणून Shopping वर पैसा उधळून झाला. सगळी नाटकं करून झाली Job लगने की खुशी में | एकदाचा जोईनिंग चा दिवस उजाडला. कधी नव्हे ते Alarm होण्याआधी तो बंद केलामला एवढ्या सकाळी उठलेलं बघून आई खुश. बाबांचा सल्ला, "बाळा झोप अजून पेपर नाही आला."  कोणाच्याही लक्षात नव्हतं आज माझा 1st  day आहे 1st  Job चा. अर्थात आई - बाबा तसं दाखवत होते पण तेही खूप Excited होतेसगळं आवरून शेवटी एकदाचा दिलेल्या वेळेच्या १५ मिनिटे आधी पोहोचलो Company मध्ये. स्वताची पाठ थोपटण्याचा विचार केला पण शरीरयष्टी लक्षात घेऊन विचार सोडला आणि गेट मधून सरळ आत निघालो.
 तेवढ्यात Security Guard ने अडवलं आणि, " Excuse  me Sir, Where is your Access Card?" असं विचारलं. अचानक झालेल्या English च्या हल्यातून मी सावरताच "Yes Yes  Access Card, but dont have it. Can give SBI card ?" इति मी. English  ची हेंडसाळ  बघून  त्याला लक्षात आलं, पोरगं नवीन आहे, आणि त्याने सरळ  "Offer Letter  किधर है? " असा राष्ट्रभाषेत प्रश्न विचारला. Offer Letter बघून त्याने अमुक अमुक बिल्डिंग मध्ये जायला सांगितलं. आत गेल्या गेल्या Receptionist ने हसून बसायला सांगितलं. बर वाटलं कोणी तरी आपल्यावर हसता आपल्याकडे बघून हसलं. तिथे गेल्यावर माझ्या सारखेच उस्ताही कार्यकर्ते दिसल्याने जरा बरं वाटलं.लवकरच आम्हाला Training room  मध्ये नेण्यात आलं. एकदाचा Induction Program  सुरु झाला.
Induction Program विषयी ही लिहायचं होतं पण सो called Privacy Policy असल्यामुळे ते लिहिता येणार नाही. (हायसं वाटलं तुम्हाला अजून वाचायचं नाही आणि मला लिहायचं नाही म्हणून.)