हा हा म्हणता एकदाची डिग्री पूर्ण झाली आणि मी एक सुशिक्षीत पदवीधर झालो. Engineeringला असताना अभ्यास करावा, नाही करावा कसा करावा ह्या बद्दल संभ्रम. पण ह्याच Engineering नी ४० ह्या आकड्याचं महत्त्व समजावलं. Engineering चा पेपर दिल्या दिल्या ४० ही magic figure गाठली की झालेल्या आनंद तर अवर्णनीय. नेमून दिलेल्या ४ वर्षातच Engineering झालं एवढीच काय ती आमची achievement. बाकी Campus Selection चा तर प्रश्नच नव्हता कारण ४० ह्या आकड्याचा इतका प्रभाव होता marksheets वर की कंपनीच्या लोकांनी आधीच झिडकारलं. सो Companies ने or अन्य कुणी आम्हाला select केलं आणि आम्ही कुणा एकाला select करण्याचा सवालच नव्हता. थोडक्यात अमुक अमुक कॉलेज ला असून Campus interview ला appear न होताच आम्ही बाहेर पडलास असा शिक्का घेऊन बाहेर पडलो.
बर घरी Degree Certificate दाखवलं तर घरून प्रश्न, "काय खरी आहे का ? काय भाव आहे Degree Certificate चा ? किती मध्ये मिळाली ?" ह्या सर्व प्रश्नांची उगम एकच, ४० हा आकडा. घरच्यांनी खूप शिक सांगितलेलं पण खूप वेळ शिकावं की काय असा प्रश्न आला मनात,पण Engineering करतानाच एवढा थकलो की पुढे शिकण्याचा प्रश्नच येत नव्हता. खूप वेळ शिकावं का असा विचार घरी बोलून दाखवला होता पण बोलणी फिसकटली आणि सुदैवाने ४ वर्षातच सुशिक्षित पदवीधर Engineer बेकार झालो.
Result लागे पर्यंत आणि Result लागल्यानंतर च्या काळात जे मानसिक झीज झाली ती भरून काढण्याचा उपाय म्हणजे 'झोप' अत्यंत काटेकोरपणे पाळला. मी अगदी Time Table केलं होतं.
अमुक अमुक वेळ सकाळची झोप. मग ह्या वेळेत दुपारची झोप. रात्रीची झोप तर हवीच. हे झालं मानसिक थकवा आलेला त्याच.शाररीक थकव्याचा प्रश्नच नव्हता कारण घरून आधीच सांगितलं होतं, तब्येतीला सांभाळून Engineering करा. हे इतकं मनात बसलं होतं की बाळसं कमी होण्याचा प्रश्नच नव्हता. वाढता वाढता वाढे चालूच होतं.
माझी झोप बघून घरच्यांची झोप उडाली. शेवटी वैतागून त्यांनी एक फतवा काढला, इथून पुढे ३ महिन्यांनंतर आपले आर्थिक मदत बंद करण्यात येणार आहे. योग्य तो विचार करून,
पावले उचलावीत. फतवा आईने काढल्या असल्याने गोष्ट Serious आहे हे लक्षात आलं आणि जागं व्हायची वेळ आली. पण काय करावं हे माहीत नसल्याने सगळं करून झालं अगदी Java च्या क्लासेस पासून ते बँकेच्या परीक्षांपर्यंत. ३ महिन्याची मुदत ही संपत आली होती म्हणून शेवटी Testing चा Course join केला.
"Testing म्हणजे आय रे दादा?" असा लहान भावाचा प्रश्न हजर. त्याला समजेल अशा भाषेत सांगितलं की Testing म्हणजे चुका काढणे तर त्याने इतक्या तुच्छतेने बघितलं की अजून ही कधी कधी मी दुपारी दचकून जागा होतो.शेवटी एकदाचा Course सुरु झाला. हळूहळू Course मधलं सगळं कळत होतं त्यामुळे हायसं वाटत होतं. इथे सगळ्यांचा Campus Interview ला appear होतं येणार असल्याने एक स्वप्न तरी पूर्ण होणार होतं.बर Campus Interviewला appear होऊन मला जॉब मिळाला होता. Testing चे Seeds चांगले पेरालेगेल्यामुळे Job मिळाला होता.
कोणाचाही विश्वास बसत नव्हता पण एकदाचा Job लागला होता. Offer Letter घ्यायला कंपनी मधेच बोलावलं होतं. तिथं गेल्यावर उगाच असं वाटत होतं की, सगळेच आपल्या कडे बघत आहेत. पण अजूनही पूर्णतः antic piece झालेलो नव्हतो ह्या confidence ने Offer Letter घेऊन एकदाचा घरी आलो. घराचे एकदम खुश होते. निवांतपणे Offer Letter वाचायला घ्यायचा विचार केला पण Offer Letter १२ पानी होतं आणि ३ पेक्षा जास्ती इंग्लिश pages वाचायची असली की हातात पेन्सील हवीच ह्या Engineering च्या नियमानुसार पेन्सिल शोधून झाली. साधारण ५० शब्दानंतर Bore व्ह्यायाला लागल्याने मुख्य पान काढलं, Salary Structure चं. पण इथेही काही न कळल्याने सरळ प्रतिमहिना किती हातात येणार हे अतिशय सोपं Calculation करून Offer Letter ठेऊन दिलं. Joining date next month मध्ये होती.
Corporate World मध्ये जायचं म्हणून Shopping वर पैसा उधळून झाला. सगळी नाटकं करून झाली Job लगने की खुशी में | एकदाचा जोईनिंग चा दिवस उजाडला. कधी नव्हे ते Alarm होण्याआधी तो बंद केला. मला एवढ्या सकाळी उठलेलं बघून आई खुश. बाबांचा सल्ला, "बाळा झोप अजून पेपर नाही आला." कोणाच्याही लक्षात नव्हतं आज माझा 1st day आहे 1st Job चा. अर्थात आई - बाबा तसं दाखवत होते पण तेही खूप Excited होते. सगळं आवरून शेवटी एकदाचा दिलेल्या वेळेच्या १५ मिनिटे आधी पोहोचलो Company मध्ये. स्वताची पाठ थोपटण्याचा विचार केला पण शरीरयष्टी लक्षात घेऊन विचार सोडला आणि गेट मधून सरळ आत निघालो.
तेवढ्यात Security Guard ने अडवलं आणि, " Excuse me Sir, Where is your Access Card?" असं विचारलं. अचानक झालेल्या English च्या हल्यातून मी न सावरताच "Yes Yes Access Card, but dont have it. Can give SBI card ?" इति मी. English ची हेंडसाळ बघून त्याला लक्षात आलं, पोरगं नवीन आहे, आणि त्याने सरळ "Offer Letter किधर है? " असा राष्ट्रभाषेत प्रश्न विचारला. Offer Letter बघून त्याने अमुक अमुक बिल्डिंग मध्ये जायला सांगितलं. आत गेल्या गेल्या Receptionist ने हसून बसायला सांगितलं. बर वाटलं कोणी तरी आपल्यावर न हसता आपल्याकडे बघून हसलं. तिथे गेल्यावर माझ्या सारखेच उस्ताही कार्यकर्ते दिसल्याने जरा बरं वाटलं.लवकरच आम्हाला Training room मध्ये नेण्यात आलं. एकदाचा Induction Program सुरु झाला.
Induction Program विषयी ही लिहायचं होतं पण सो called Privacy Policy असल्यामुळे ते लिहिता येणार नाही. (हायसं वाटलं तुम्हाला अजून वाचायचं नाही आणि मला लिहायचं नाही म्हणून.)
This comment has been removed by the author.
ReplyDeletei have added comment as "Good one" nothing else.
DeleteVarchi Comment ka delete keli be ? Kharch hote ki re tyache :D :D
ReplyDelete"३ पेक्षा जास्ती इंग्लिश pages वाचायची असली की हातात पेन्सील हवीच"
ReplyDeleteमस्त...
येऊ द्या Induction विषयी पण... privacy policy गेली उडत...
फक्त शब्द चांगले वापरायचे. मराठी शब्दाला प्रती-इंग्रजी शब्द वापरले कि सगळं चालतं. उदाहरण देऊ?
I haven't deleted any comment.... This must be Google's pblm :)
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete